कर्जोदच्या शेतकर्‍याच्या म्हशी लांबवल्या

0

रावेर- तालुक्यातील कर्जोद येथील शेतकर्‍याच्या 50 हजार रुपये किंमतीच्या दोन म्हशी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याप्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शेतकरी विनोद रघुनाथ सावळे (30, रा.कर्जोद) यांच्या फिर्यादीनुसार अहिरवाडी रस्त्यावरील वाड्याच्या लाकडी वाड्यातून 50 हजार रुपये किंमतीच्या दोन म्हशी 24 रात्री 11 ते 25 च्या पहाटे पाच दरम्यान चोरट्यांनी लांबवल्या. एका म्हशीचे शिंग गोल व एका म्हशीचे शिंग फाट्याच्या आकाराचे असल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास हवालदार जितेंद्र जैन करीत आहेत.