कर्जोद शिवारात अज्ञाताने केळी कापल्याने लाखोंचे नुकसान

0

रावेर: तालुक्यातील कर्जोद येथील जुन्या केर्‍हाळा रस्त्यावरील शेतातील नवती केळीचे तब्बल चार हजार खोड अज्ञात माथेफिरूने कापल्याने शेतकर्‍याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शुक्रवारी ही घटना उघडकीस आली. गोपाळ भिका पाटील या शेतकर्‍याने नफ्याने घेतलेल्या शेतात हा प्रकार घडला.