कर्ज डोईजड झाल्याने भानखेड्याच्या शेतकर्‍याची आत्महत्या

0

बोदवड- तालुक्यातील भानखेडा येथील गजानन शालीग्राम निकम (35) या तरुण शेतकर्‍याने सावकारी कर्जाला कंटाळून बटाईच्या शेतात फवारणीसाठी जाण्याचे निमित्त करीत काहीतरी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वरणगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.हेडवे यांनी शवविच्छेदन केले. दरम्यान, निकम यांच्यावर खाजगी व अन्य मिळून सुमारे तीन लाखांचे कर्ज होते शिवाय कर्ज वसुलीसाठी बैल व्यापारीदेखील तगादा लावत असल्याचे समजते. मयत गजानन निकम यांच्या पश्‍चात दोन मुले, पत्नी, आई, वडील असा परीवार आहे. या घटनेमुळे भानखेडा गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.