पिंपळनेर। येथे कर्ज पे चर्चासाठी आ. डी. एस.अहिरे , जि.प. सदस्य विलास बिरारीस यांनी कुडाशी युनियन बँक शाखेचे शाखाप्रमुख संदिप वर्मा , व सहाय्यक प्रबंधक सचिन पिंगळे यांच्याशी कर्ज पे चर्चा करून निवेदन देण्यात आले.निवेदनात शासनाने जाहीर केलेल्या कर्ज माफीत निकषानुसार पात्र ठरलेल्या व अपात्र ठरलेल्या शेतकरी सभासदांची यादी मिळणेबाबत., शासनाने जाहिर केलेल्या तातडीच्या 10 हजार रूपये कर्ज कीती सभासदांना दिली त्याची माहिती कर्जमाफीसंदर्भात शासनाच्यावतीने प्राप्त झालेल्या निर्देशांची छायांकित प्रती मिळणेबाबत रूपांतर/फेररूपांतर व पुर्नगठण याच्यात बसणा-या सभासद शेतक-याची यादी मिळणेबाबत सदर निवेदन साक्री तालुका कॉग्रेस कमेटी ता.साक्री.जि.धुळे यांचे वतीने देण्यात आले.
यावेळी होते उपस्थित
युनियन बँकेचे शाखाप्रमुख संदीप वर्मा यांना निवेदन देतांना आ.डी.एस.अहिरे, जि.प.सदस्य विलास बिरारीस, पं.स.सदस्य गणपत चौरे, शांताराम कुवर, मगण पवार, तसेच शाहिराम बागुल, वामन चौरे,उत्तम शिंदे , भिका अहिरे, जेजीराम पवार, राजू अहिरे , बाळू गायकवाड, काळूराम अहिरे, रघुनाथ चौरे, किरण अहिरे व परिसरातील सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.कुडाशी युनियन बँक शाखेचे शाखाप्रमुख संदिप वर्मा , व सहाय्यक प्रबंधक सचिन पिंगळे यांच्याशी कर्ज पे चर्चा संदर्भात सांगितले की तुम्ही मागितलेले कागद पत्राच्या प्रती ( यादया) दोन दिवसात उपलब्ध करून देऊ.