रावेर : दडपशाही व हुकूमशाही करणार्या केंद्र सरकारचा अतिरेक सामान्य जनता खपवून घेणार नाही, भविष्यात जनताच या सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवय राहणार नाही, असे मत आमदार शिरीष चौधरी यांनी येथे व्यक्त केले. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर केंद्र सरकारने लावलेल्या ईडीच्या चौकशा सुड बुध्दीने सुरू आहेत. 15 वर्षांपूर्वी या चौकशा झालेल्या असताना पुन्हा केंद्र सरकार विनाकारण त्रास देत आहे. याचा यावेळी काँगेसच्या पदाधिकार्यांनी निषेध केला. रावेरातील काँग्रेस भवनासमोर केंद्र सरकारच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आमदार चौधरी बोलत होते.
कर्ज बुडव्यांना कर्ज माफ मात्र शेतकरी वार्यावर
कोटींची कर्ज बुडवणार्या उद्योजकांना केंद्र सरकारने कर्ज माफ केले आहे. मात्र शेतकर्यांना कर्ज माफी दिली जात नसल्याची स्थिती आहे. महागाईचा सतत मारा जनतेवर सुरू असल्याने सामान्य जनतेत भाजप विषयी असंतोष निर्माण झाला आहे, अशा भावना आमदार शिरीष चौधरी यांनी यावेळी व्यक्त केल्या. आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी नगराध्यक्ष हरीष गणवाणी, माजी नगराध्यक्ष दारा मोहंमद, काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष संतोष पाटील, अॅड.योगेश गजरे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, पी.आर.पाटील, राजू सवर्णे, महिला तालुकाध्यक्ष मानसी पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.