अहमदनगर । कर्जमाफीचे अनुदान लाभार्थी शेतकर्यांच्या खात्यावर 1 ऑक्टोबरपर्यंत वर्ग करण्यात येणार असल्याची घोषणा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली आहे. अर्थसंकल्पातील पुरवणी मागण्यांत वीस हजार कोटींची स्वतंत्र तरतूद त्याकरिता करण्यात आल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. आतापर्यंत कर्जमाफीचे 26 लाख अर्ज दाखल झाले असून 30 सप्टेंबरपर्यंत त्यांची छाननी पूर्ण होणार आहे.