मेलबर्न । ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ सोशल मिडीयावर अशी काही चुक केली की नेटीझन्सनी त्याची खिल्ली उडवली आहे. स्मिथने ट्विटरवर एक पोस्ट टाकली होती, त्या पोस्टमध्ये त्याचा आणि त्याच्या बायकोचा फोटो होता. पण त्याने टॅग करताना बायकोला न करता दुसर्याच महिलेला चुकून टॅग केले. आणि त्याला नेटीझन्सनी ट्रोल केले आहे. स्टीव्ह स्मिथने ओस्ट्रेलियन ओपन या ग्रॅडस्लॅम स्पर्धेत एक सामन्यासाठी प्रेक्षक म्हणून हजेरी लावली होती. त्याने याचे सोशल मीडियावर अनेक फोटोही शेयर केले आहे.
रविवारी झालेल्या सामन्यात फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनवर आपले नाव कोरले. त्यानंतर त्याने ट्विट करत त्याचे अभिनंदनही केले आहे. 22 जानेवारी रोजी स्मीथने पत्नीसोबतचा एक खास फोटोही शेअर केला होता. हे करताना त्याने एक चूक केली. त्याने ट्विटरवर बायको डॅनी विल्स हिला चुकीचं टॅग केल आहे. यामुळे स्मिथला ट्विटरवर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे.