भारीपाच्या पदाधिकार्यांना अटक व सुटका ; भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
भुसावळ- शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष निरीक्षक नजन पाटील यांची चोपडा पोलिस ठाण्यातून झालेली बदली भाजपाच्या राजकीय दबावामुळे झाली असून ही बदली रद्द करावी तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी भारीपातर्फे भुसावळात यावल नाक्यावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ मंगळवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास भारीपा पदाधिकार्यांनी रस्ता रोको केला. सुमारे 15 मिनिटे चाललेल्या या आंदोलनाने वाहतूक विस्कळीत झाली होती. शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त प्रसंगी तैनात केला तर 13 पदाधिकार्यांना अटक करून शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले व नंतर काही वेळांनी त्यांची सुटका करण्यात आली तर रावेरात प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
भुसावळात कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन
भारीपाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे व युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. प्रसंगी आंदोलकांनी पोलिस प्रशासनाच्या कृतीविषयी तीव्र घोषणाबाजी केली. आंदोलनात शहराध्यक्ष गणेश इंगळे, तालुका महासचिव प्रल्हाद घारू, युवा शहराध्यक्ष विद्यासागर खरात, रूपेश साळुंके, प्रमोद बावस्कर, बबन कांबळे, देवदत्त मकासरे, अरुण नरवाडे, अरुण तायडे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित हेाते.
रावेरात प्रशासनाला निवेदन
रावेर- तालुका भारीप बहुजन महासंघाच्या वतीने चोपडा येथील कर्तव्य निष्ठ पोलिस निरिक्षक किसनराव पाटील यांचा भाजपाच्या राजकीय दबाबतंत्रामुळे तडकाफडकी बदली केल्याच्या निषेधार्थ तीव्र निषेध करण्यात आला. रावेर तहसीलदार तसेच पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांना निवेदन देण्यात आले.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
निवेदनावर भारीपा जिल्हा सचिव महेश तायडे, तालुकाध्यक्ष बाळु शिरतुरे, तालुका उपाध्यक्ष सुरेश अटकाळे, सलिम शाह, दादाराव इंगळे, सरचिटणीस साहेबराव वानखेडे, तालुका सचिव राजकुमार इंगळे, सुनील कोंघे, प्रकाश टोपलु तायडे, विजय अवसरमल, सुनील खैरे, देवानंद मोरे, मुकेश वाघ, एमआयएमचे तालुकाध्यक्ष शे.वसीम शे.अकबर शे, असगर, भारीपचे कन्हैया गाढे, राहुल गाढे, उमेश सवर्णे, किरण वाघ, आकाश वाघ, राहुल निंभोर, प्रदीप तायडे, विक्की अरुण तायडे, योगेश निकम, राजेंद्र कोंघे, स्वप्नील बिर्हाडे, अमित तायडे, तरुण गाढे, भूषण सवर्णे, अजय सवर्णे, हेमंत पाटील, रमाकांत तायडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.