जळगाव । उज्वल एज्युकेशन ट्रस्ट(स्कूल) या संस्थेला दिलेला खुला भूखंडाचा वापर करतांना बांधकाम करतांना अटी व शर्तींचा भंग केला असून याबाबत भाजपा नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी तक्रार केली होती. ही तक्रार त्यांनी तात्कालीन सहाय्यक नगररचनाकार चंद्रकांत निकम व अभियंता विजय मराठे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
परंतु, त्यांनी 81 बची नोटीस न बजावता साधी नोटीस बजविल्याने संस्था न्यायालयात गेली आहे. यामुळे चंद्रकांत निकम व विजय मराठे यांना कर्तव्यात कसूर केला म्हणून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी पृथ्वीराज सोनवणे यांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे. तसेच यात मनपाचा वेळ आणि न्यायालयीन खर्च वाढल्याने त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्यात यावी असे म्हटले आहे. याप्रसंगी विरोधी गट नेते सुनील माळी उपस्थित होते.