कर्तव्यावर असलेल्या पोलीसास मारहाण; एकास 6 महिन्यांची शिक्षा

0

नवापूर । नंदुरबार पोलीस मुख्यालयातील पो. कॉ. किशोर मोहन वळवी पोलीस यांना मारहाण केल्या प्रकरणी एकास नवापूर न्यायालयाने 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. नंदुबार पोलीस मुख्यालय पो. कॉ. किशोर वळवी हे 2013 मध्ये आमदार शरद गावीत यांचे बाँडीगार्ड म्हणुन कर्तव्यावर होते. दरम्यान 1 डिसेंबर 2013 रोजी दुपारी 12:30 वाजता नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक मतदान असल्याने आमदार शरद गावीत यांच्यासोबत अंगरक्षक म्हणुन किशोर वळवी होते.

नगारे गावातुन वडदा गावाकडे जात असतांना धिरसिंग इसर्‍या नाईक यांनी रस्त्याचा मध्यभागी मोटार सायकल उभी केली होती. ती बाजुला घेण्यास सांगितल्याचा राग येऊन धिरसिंग इसर्‍या नाईक यांनी पो. कॉ. किशोर वळवी यांना तोंडावर वीट मारुन जखमी केले होते. याबाबत वळवी यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पो. कॉ. कृष्णा वळवी यांनी सदर गुऩ्हयाचा तपास केला. न्या एन. आर. येलमाने यांनी 6 महिने शिक्षा 2 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सदर साक्षीकामी पो. का. किशोर वळवी,माजी आ. शरद गावीत,तपास अधिकारी डॉ. आशिष राऊत यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. सहा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. विद्या देवरे यांनी काम पहिले.