अंबरनाथ । कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेवक सुभाष साळुंखे आणि संवाद फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंखे यांंनी कर्तृत्ववान महिलांचा आणि मायलेकींचा सन्मान व महिला आनंद मेळाव्याचे आयोजन अंबरनाथ पूर्वेकडील बाबासाहेब पुरंदरे सभागृहात येथे करण्यात आले होते. तसेच मनुश्री आर्टस् प्रस्तुत, स्वरप्रित निर्मित जल्लोष कलेचा या आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सुभाष साळुंके यांच्या कार्याविषयी आणि उपक्रमांविषयी विशेष कौतुक केले. विद्यार्थी सेनेपासून ते आजवर निष्ठेने कार्य करणारा असा शिवसैनिक व नगरसेवक म्हणून मला सुभाषच्या प्रत्येक कार्याबद्दल अभिमान वाटतो. अश्या शब्दांत लांडगे यांनी कौतुक केले तसेच या वेळी अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनीषा अरविंद वाळेकर, अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनीसुद्धा नगरसेवक नेमका कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुभाष साळुंके. असे आपल्या भाषणात सांगितले. त्याचबाबरोबर माजी नगराध्यक्ष विजय पवार, आरोग्य सभापती रवींद्र पाटील, डोंबिवली महिला शहर संघटक कविता गावंड, यास्मिन व नाझीम शेख उपस्थितीत होते.
स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार
पाककला स्पर्धेत संगीता हरियान (प्रथम), मनीषा आवारे (द्वितीय), सायली सरदार (तृतीय), वृषाली भारांबे (चतुर्थ) यांच्यासह मनीषा शेलार, भारती कदम आदींना पुरस्कार देण्यात आले. यावेेळी खास महिलांसाठी असलेला लकी ड्रॉ आणि त्यामधील आकर्षक बक्षीस मानाची पैठणी व सौभाग्यलंकाराच्या अक्षया अशोक पतंगे (मानाची पैठणी), वैदेही विनायक कदम (सोन्याची नथ), संगीता अरुण भोसले (चांदीचे पैंजण), सुवर्णा का. मोरे (चांदीचा करंडा), श्रावणी सुहास सावंत (मोत्याच्या बांगड्या), राणा प्रयणबा (चांदीची जोडवी) आदींचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची गडकरी, गोडांबे आणि मनोज फळके यांनी केले. प्रास्ताविक नगरसेवक सुभाष साळुंके व आभारप्रर्दशन सुवर्णा साळुंके यांनी केले.
यांना आले गौरवण्यात
रोहिणी पेडणेकर व दामिनी पेडणेकर, रश्मी शेणॉय व नुपूर शेणॉय, श्रद्धा साळवी व स्नेहा साळवी, किना संघवी व ऐकता संघवी, हेमा कर्वे व ऋचा कर्वे आदीं मायलेकीना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, तर कर्तृत्ववान महिला पुरस्कार मध्ये तेजस्विता प्रसन्न चौधरी (सामाजिक), अनघा लेले (सामाजिक व योगाभ्यास), डॉ. सुप्रिया शिवाजी कापसे (पशु वैद्यक), वैशाली दिनेश डीकोंडा (चित्रकला), चेतना चंद्रकांत झांजे (पत्रकारीता), अंजना आत्माराम चाळके (लघु उद्योग), निर्मला वि. पांडे (स्वयंरोजगार रिक्षाचालक) आदी महिलांचा आणि माता-पिता पुरस्कारमध्ये नंदा वसुनील रामचंद्र देशपांडे दांपत्याला गौरवले.