कर्तृत्ववान महिलांच्या कामगिरीचे कौतुक

0

भुसावळ । शहर व परिसरात जागतिक महिला दिनानिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक संघटनांतर्फे कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिलांचा सत्कार करण्यात आला.

पु.ओं. नाहाटा महाविद्यालय
महाविद्यालयाच्या सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. मिनाक्षी वायकोळे होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्त्या शिलांबरी जमदाडे होत्या. यावेळी त्यांनी सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले. निलिमा झोपे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विद्यार्थीनी विकास मंडळाच्या प्रमुख प्रा.डॉ. आशालता महाजन यांनी केले.

काँग्रेस कमिटी, भुसावळ
येथील नसरवानजी फाईलमधील राजीव गांधी वाचनालयात जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागातर्फे महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मो. मुनव्वर खान, जिल्हा उपाध्यक्ष जे.बी. कोटेचा यांनी महिला पदाधिकार्‍यांचा सत्कार केला. याप्रसंगी अनिता खरारे यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्यामुळे, मुख्याध्यापिका कल्पना तायडे यांनी उत्कृष्ट कार्य केल्यामुळे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देवून स्त्रीभृण हत्या बंद करणे, बेटी बचाव बेटी पढावचा संकल्प करण्यात आला. यावेळी कल्पना तायडे, अनिता दहातोंडे, पल्लवी इंगळे, शिला परदेशी, उषा सोनवणे, मिना कश्यप, छाया बाविस्कर, शमिमबानो, सलिम गवळी, भिमराव तायडे, अन्वर तडवी, नईम मजहर, यु.एल. जाधव आदी उपस्थित होते.

शिवसेनेतर्फे सत्कार
शहर शिवसेना व युवासेनेतर्फे शहरात विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. किर्ती फलटणकर, अ‍ॅड. अश्‍विनी डोलारे, कल्पना टेमाणी, उज्वला बागुल यांचा सत्कार झाला. याप्रसंगी शहरप्रमुख तथा नगरसेवक मुकेश गुंजाळ, ज्येष्ठ कार्यकर्ते अबरार शेख, युवासेना शहर अधिकारी मिलींद कापडे, उपशहरप्रमुख राकेश खरारे, विभागप्रमुख उमाकांत शर्मा, सोनी ठाकुर, अरुण साळुंखे, राहुल सोनटक्के, सुरज पाटील आदी उपस्थित होेते.

मुक्ताईनगर येथे महिला मेळावा
जिल्हा परिषद कन्या शाळेत महिला मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉ. प्रणिता सरोदे होत्या. उद्घाटन नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या भारती भोई व गटशिक्षणाधिकारी जे.डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आलेे. प्रमुख वक्त्या म्हणून प्रा. प्रतिभा ढाके, क्रीडा शिक्षिका अ‍ॅड. सुरेखा सोनार यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी आम्रपाली बोदडे, मायावती बोदडे, रत्नमाला चौधरी, सलमा तडवी, कविता सुरवाडे, गणेश भगत, समाधान सावळे यांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन मुख्याध्यापिका सुशिला हळपे यांनी केेले.

कुर्‍हाकाकोडा येथे कार्यक्रम
मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हाकाकोडा येथे महिला मेळावा घेण्यात आला. यात महिला बचत गटाच्या सदस्या, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य अशोक कांडेलकर, पंचायत समिती उपसभापती प्रमिला राठोड, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या विद्या पाटील, जिल्हा परिषद सदस्या वनिता गवडे, सरपंच ओमप्रकाश चौधरी, तहसिलदार जितेंद्र कुवर, गटविकास अधिकारी डिगंबर लोखंडे, पीएसआय वंदना सोनवणे आदी उपस्थित होते.

कंडारीत महिलादिन
येथील ग्रामपंचायत कार्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या रुपाली सुर्यवंशी तसेच नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या आशा निसाळकर यांचा उपसरपंच रुपाली दुसाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच योगिता शिंगारे, समतादूत कल्पना बेलसरे, सैय्यद मुस्तफा, डॉ. सुर्यभान पाटील, गौतम जोहरे, मनिषा महाजन, भारती लोखंडे, कविता देवरे यांची उपस्थिती होती. ग्रामसेवक ए.डी. खैरनार यांनी सुत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी संतोष निसाळकर, संदिप शिंगारे, दिलीप मोरे यांसह कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

यावेळी पवन ठाकुर, बिलकिसनजा पठाण, रविना शिंदे व प्रा. संगिता भिरुड यांनी स्त्री जीवनावर आधारित कविता सादर केल्या. सुत्रसंचालन प्रा. समाधान पाटील यांनी केले तर आभार प्रा. स्मिता चौधरी यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. रश्मी शर्मा, प्रा. ममता पाटील, प्रा.डॉ. रेखा गाजरे, प्रा.डॉ. के.के. अहिरे, प्रा.डॉ. स्वाती नारखेडे, प्रा. नयना पाटील, प्रा.डॉ. रुपाली चौधरी, रेखा बर्‍हाटे, जे.एफ. पाटील यांनी परिश्रम घेतले.