कर्तृत्वानंतरचे कर्तव्य समाधान देणारे : प्रकाश पाठक

0

भुसावळला भारत विकास परिषदेची स्थापना : दायित्वग्रहण समारंभ

भुसावळ- कर्तृत्व सिद्ध होते तेव्हा कर्तव्य उदयास येते व हे कर्तव्य समाधान देणारे असते, असे मत प्रसिद्ध विचारवंत व नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलचे कार्याध्यक्ष प्रकाश पाठक यांनी येथे व्यक्त केले. शहरातील आयएमए हॉलमध्ये आयोजीत भारत विकास परिषद शाखेच्या दायित्व ग्रहण समारंभप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ समाजसेवक राधेश्याम लाहोटी अध्यक्षस्थानी होते. आमदार संजय सावकारे, रामबंधु मसाल्याचे प्रमुख व परिषदेचे राष्ट्रीय अतिरिक्त सरचिटणीस उमेश राठी (नाशिक), राष्ट्रीय सचिव राजेंद्र जोग (पुणे), विभागीय सचिव श्रीपाद टाकळकर (औरंगाबाद), सचिन गांजवे (पुणे) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कर्तृत्व सिद्धीनंतर कर्तव्याचा उदय
पाठक म्हणाले, की कर्तृत्वातून धनसंपत्ती, पद, प्रतिष्ठा प्राप्त होते. पण जेव्हा कर्तृत्व सिद्ध होते तेव्हा कर्तव्याचा उदय होतो. कर्तृत्व हे कर्तव्यात परावर्तित होणे आवश्यक आहे कर्तृत्व हे सुख देणारे तर कर्तव्य हे समाधान देणारे असते. समाधान हे जीवनाला कृतार्थ बनवते महात्मा गांधींनी सात सामाजिक पातक सांगितले आहेत. कर्माशिवाय संपत्ती, तत्त्वविहीन राजकारण आदींचा यात समावेश आहे. समाजाप्रती आपण आपले दायित्व आपण सिद्ध केले पाहिजे असे सांगितले.

नव्या पिढीला संस्काराची गरज -आमदार सावकारे
आमदार सावकारे म्हणाले, मुले शिक्षण घेत आहेत मात्र संस्कारात ते कमी पडतात. जितके जास्त शिक्षण तितके घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. लहान गोष्टीसाठी मुले जिद्द करतात व त्या मिळाल्या नाही की आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. नव्या पिढीला संस्कारांची आवश्यकता आहे.

नूतन पदाधिकार्‍यांनी सूत्रे स्वीकारली
मनालीजवळ दरीत उतरुन अपघातग्रस्तांना मदत करणार्‍या भुसावळच्या डॉ.वीरेंद्र झांबरे, निलेश चौधरी यांचा याप्रसंगी सत्कार केला. परीषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. नीलिमा नेहते व सचिव उज्वल सराफ यांच्याकडे पदाच्या दायित्वाची सूत्रे राजेंद्र जोग यांनी दिली. डॉ. मनीषा दावलभक्त यांनी सूत्रसंचालन केले. उज्वल सराफ यांनी आभार मानले.

यांनी घेतले परीश्रम
यशस्वीतेसाठी जिल्हा संयोजक योगेश मांडे, विभागीय अध्यक्ष तुषार तोतला, उपाध्यक्ष विलास पालक, महिला प्रतिनिधी डॉ. अर्चना खानापूरकर, संघटन सचिव भूषण वाणी, कोषाध्यक्ष सुनील इंगळे, रमाकांत भालेराव, निखील वायकोळे, अनघा पाटील, शामसुंदर माहेश्वरी, विजय जोशी, गौरव हिंगवे, शंभु मेहंदळे, डॉ.संजय नेहेते, डॉ.मनिषा दावलभक्त, विलास फालक, नितीन दावलभक्त, उज्ज्वल सराफ, किशोर शिंपी, श्यामसुंदर दरगड, विजय जोशी, गौरव हिंगवे, आनंद फडके, अभिराम मेहेंदळे, सुजित भोळे, कपिल मेहता, समीर खानापूरकर, संजय लाहोटी, दीपक फालक, विशाल अग्रवाल, संजय चौधरी, तेजस महाजन, गोकुळचंद अग्रवाल, सुनील जावळे, अनंत भिडे, डॉ.किर्ती फलटणकर, बालकिसन पासी, योगेश मांडे, विभुते, पत्रकार श्रीकांत जोशी, राधा चव्हाण यांनी परीश्रम घेतले.