कर्नाटकच्या कर्मचार्‍यांना लागणार सरकारी ‘वेसण’

0

बंगळुरू । कर्नाटक राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांनी आता फक्त कार्यालयांतच नाही तर खासगी आयुष्यातही शिस्तीनेच वागावे लागणार आहे अन्यथा थेट आता सरकार नोकरीवरून कमी करेल अथवा प्रमोशनच्या सर्व संधी काढून घेणार आहे. अशा अर्थाचा महत्त्वपूर्ण ठराव आज कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी असोसिएशनच्या वतीने घेण्यात आला आहे. नुकतेच या असोसिएशनच्या वतीने याबाबत सर्वांना हा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. या ठरावानुसार जे सरकारी कर्मचारी आपल्या लग्नाच्या बायकोशिवाय विवाहबाह्य संबंधामुळे पत्नीशी व्यवस्थित वागत नाहीत, बहीण भाऊ आणि पालकांनाही त्यांनी बेदखल केले आहे, वृद्ध पालकांना कोणतीही आर्थिक मदत केली जात नाही, अशा सर्व तक्रारींची दखल सरकारकडून घेण्यात येणार आहे.

सरकारी कर्मचार्‍यांच्या बेजबाबदार वागण्याला वेसण घालण्याकरिताच त्यांचा पगार रोखणे, प्रमोशन रद्द करणे तसेच नोकरीवरून काढून टाकणे आदी तरतुदी करण्यात आल्या आहेत.