नवी दिल्ली: कर्नाटक सरकार अडचणीत सापडले आहे. काही आमदारांनी राजीनामा दिल्याने सरकार अल्पमतात आले आहे. दरम्यान कर्नाटकचे राजकारण आता दिल्लीत पोहोचले आहे. कर्नाटकातील राजकीय परिस्थितीला भाजप कारणीभूत असल्याचे म्हणत कॉंग्रेस खासदारांनी लोकसभेत गोंधळ घातले. नाराज कॉंग्रेस खासदारांनी सभा त्याग करत नाराजी नोंदविली.
भाजपानेच कर्नाटकमध्ये ही सगळी परिस्थिती निर्माण केली आहे. संधी मिळताच शिकार करायची ही भाजपाची वृत्ती आहे. या वृत्तीला आळा बसला पाहिजे अशी मागणी लोकसभेत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली. भाजपाला असे वाटते आहे की देशात आपली सत्ता आहे तेव्हा सगळ्या राज्यांमध्येही आपलीच सत्ता असावी. त्यामुळे भाजपाकडून राजकीय फोडाफोडी होते आहे असंही ते म्हटले आहेत. दरम्यान या मुद्द्यावरून गोंधळ घालत काँग्रेसने सभात्याग केला.