कर्नाटकातील विजयाने कॉंग्रेस-जेडीएस आघाडीचा उद्देश सफल-चिदंबरम

0

बंगळूर- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक झाली त्यात कॉंग्रेस व जेडीएसच्या आघाडीला घवघवीत यश मिळविले असून ४ जागेवर आघाडीतर एका जागेवर भाजपला यश मिळाले आहे. दरम्यान काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस आघाडीचा उद्देश सफल झाला आहे असे टि्वट केले आहे.

पी.चिदंबरम यांनी आघाडीच्या विजयाची भारतीय संघाच्या कसोटी मालिका विजयाबरोबर तुलना केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ज्याप्रमाणे कसोटी मालिका जिंकतो त्याचधर्तीवर कर्नाटकात काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडीने ४-१ कामगिरी करुन दाखवली आहे असे सांगितले आहे.