कर्नाटकात आज भाजपतर्फे जनमत विरोधी दिवस

0

बंगळूर-कर्नाटकात आज कॉंग्रेस व जेडीएस आघाडी सत्ता स्थापन करत असून मुख्यमंत्री म्हणून कुमारस्वामी शपथ घेणार आहे. दरम्यान याच्या निषेधार्थ भाजपतर्फे आज जनमत विरोधी दिवस पाळण्यात येणार असून माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा याचे प्रतिनिधित्व करणार आहे. भाजपपेक्षा कमी जागा असतांना देखील कॉंग्रेस, जेडीएस मिळून सत्ता स्थापन करत असल्याने याविरोधात भाजपने जनमत विरोधी दिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात ठिकठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते निदर्शन करणार आहे.