बंगळूर: कर्नाटक विधानसभेच्या १५ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागला. भाजपला सत्ता कायम ठेवण्यासाठी ६ जागांची आवश्यकता होती. त्यातील जवळपास १२ जागांवर भाजपने विजय मिळविला आहे. मार कॉंग्रेसला केवळ दोनच जागांवर विजय मिळविता आले आहे. दरम्यान निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी घेत कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा गटनेते सिद्धरामय्या यांनी गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपविला आहे. पराभव झाल्याचे जवळपास निश्चित झाल्यांनतर सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.