कर्नाटकात भाजपला धक्का; पोट निवडणुकीत कॉंग्रेस-जेडीएस विजयाच्या दिशेने

0

बंगळूर- कर्नाटकात लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. शनिवारी मतदान झाले होते. सत्ताधारी काँग्रेस-जनता दल सेक्युलर चार जागांवर तर भाजपा एका जागेवर आघाडीवर आहे. या पोटनिवडणुकीत पाच मतदारसंघात ६७ टक्के मतदान झाले होते. ही पोटनिवडणूक काँग्रेस आणि जेडीएस आघाडीची एक परीक्षा आहे. पाच महिन्यांपूर्वीच ही आघाडी अस्तित्वात आली आहे. लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना या पोटनिवडणुकीचे निकाल तिन्ही पक्षांसाठी महत्वाचे ठरणार आहेत.

रामनगरम विधानसभा मतदारसंघात एचडी कुमारस्वामी यांची पत्नी अनिता कुमारस्वामी निवडणूक लढवत आहे. तिथे मतमोजणी पूर्ण झाली असून थोडयाचवेळात निवडणूक अधिकारी अनिता यांच्या विजयाची औपचारीक घोषणा करतील.