सोशल मिडीयावर भाजपावर टिकेचा भडीमार ; हा तर लोकशाहीचा विजय
भुसावळ- कर्नाटकात सत्ता स्थापनेचा दावा करणारे भाजपाचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीआधी दिलेल्या राजीनाम्यानंतर ते औट घटकेचे व केवळ 55 तास मुख्यमंत्री पदावर राहिल्यानंतर येथे काँग्रेस व मित्र पक्षांचे सरकार स्थापन होत असल्याने भुसावळ विभागात काँग्रेसतर्फे फटाके फोडून व पेढे वाटप करून जल्लोष करण्यात आला. हा तर लोकशाहीचा विजय असल्याची भावना पदाधिकार्यांनी व्यक्त केले.
मुक्ताईनगरात जल्लोष
अवघ्या दोन विसात भाजपाची नोटंकी उघड झाली व लोकशाहीचा विजय झाल्याने मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने परीवर्तन चौकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. काँग्रेस तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर पाटील, जिल्हा सचिव आसीफ खान, जेष्ठ नेते बी.डी.गवई, माजी सभापती मारोती सुरळकर, शहराध्यक्ष आलम शहा, अरुण कंडेलकर, युवा नेते पवन खुरपडे, युवक तालुकाध्यक्ष निरज बोराखेडे, कासम ठेकेदार, लिलाधार पाटील, फिरोज खान, ईकबाल खान, आर.के.गणेश, बाळू कंडेलकर, अतुल जावरे, सतीश पाटील, आनंद कोळी, संजय धामोळे, तुकाराम पानपाटील, महेंद्र बोरसे, निलेश पाटील, महेश खुळे, मंगेश कोळी, अनिल सोनवणे, पवन कंडेलकर, शकील आझाद, रईस शहा, विनायक कुलकर्णी, इम्रान शहा, दीपक चौधरी, रीझवान खान यासह काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावलला पेढ्यांचे वाटप
बहुमताअभावी भाजपाचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागल्याने व हा हुकूमशाहीचा पराभव झाल्याची टिका करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शनिवारी दुपारी चार वाजता पक्ष कार्यालयासमोर पेढे वाटून व फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. एम.बी.तडवी, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष देवकांत पाटील, शहराध्यक्ष कदीर खान, शहराध्यक्ष अनिल जंजाळे, राजेश कारंडे, विनोद पाटील, अतुल बडगुजर, हितेश गजरे, विनोद पाटील, किशोर माळी, योगेश चौधरी, अक्षय पाटील, तडवी, मोसीन तडवी, शाहरुख तडवी आदी उपस्थित होते.
भुसावळात काँग्रेसकडून जल्लोष
जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागातर्फे कनार्टकात काँग्रेस व मित्रपक्षाचे सरकार लवकरच स्थापन होणार असल्याच्या ऐतिहासिक घटनेमुळे भुसावळ येथील कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मिठाई वाटप करीत जल्लोष केला. माजी आमदार नीळकंठ फालक, जिल्हाध्यक्ष मो.मुनव्वर खान, जे.बी.कोटेचा, नितीन पटाव, सलीम गवळी, फकरूद्दीन बोहरी, राजेंद्र पटेल, योगेंद्रसिंग पाटील, संजय खडसे, जॉनी गवळी, मेहबूब खान, प्रवीणसिंग पाटील, प्रदीप नेहेते, इब्राहम खान, डॉ.नईम मजहर, चंद्रसिंग चौधरी, विनोद शर्मा आदी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.