कर्नाटकात येडीयुरप्पा सरकार वाचले; १० उमेदवार विजयाच्या समीप !

0

बंगळूर: कर्नाटकमधील १५ आमदार फुटून भाजपच्या गळाला लागले होते. या सर्व आमदारांवर पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात येऊन त्यांचे पद रद्द करण्यात आले होते. दरम्यान या १५ जागांवर पोटनिवडणूक झाली होती. त्याचा निकाल आज आहे. १५ पैकी १० जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याने येडीयुरप्पा यांच्या सरकारवरील धोका आता टळणार आहे.

पुन्हा सत्ता राखण्यासाठी येडीयुरप्पा सरकारला बहुमतासाठी केवळ सहाच जागा आवश्यक आहेत. त्यामुळे निकालांच्या कलांनुसार या पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. दरम्यान, काँग्रेसने आपला पराभव स्विकारला आहे. काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांनी म्हटले की, “या १५ मतदारसंघातील जनादेश आम्हाला मान्य आहे. लोकांनी दलबदलूंना स्विकारले आहे. त्यामुळे आम्ही पराभव स्विकारला आहे. या पराभवामुळे आम्ही निराश होणार नाही.”