कर्नाटकात लागणार सेवाकर

0

बंगळुरू । कर्नाटकातील विधानसभा आणि सरकारी कार्यालयाकडून आता कर आकारणी करण्यात येण्यात आहे. विधानसभा, पोलीस महासंचालक कार्यालयासह अन्य सरकारी कार्यालयाकडून किती टक्के सेवा कराची आकारणी करता येईल याचे सर्व्हेक्षण करुन त्याची माहिती देण्याचे बृहत बंगळुरु महानगर पालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागास सांगितले होते.

विधान सौधा, विकास सौधा, उच्च न्यायालय, पोलीस मुख्यालय यांसह अन्य सरकारी इमारतींचे सर्व्हेक्षण करुन झाले असून या कार्यालयाकडून कर आकारणी करण्यात येणार आहे. या कार्यालय परिसरातील स्वच्छतेसाठी 14 रुपये प्रति वर्ग फूट, पार्किगच्या जागेसाठी 2 रुपये 50 पैसे प्रतिवर्ग फूट वार्षिक शुल्क आकारण्यात येणार आहे. या कर आकारणीमुळे पालिकेला वर्षाला 2 कोटी 60 लाख रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे.

स्वच्छता, वीज आमि रस्ते या मूलभूत सुविधा आहेत. नागरिकांना या सोईसुविधा योग्यरित्या पूरविण्यात याव्या यासाठी हा निर्णय घेण्यात आला हे. सरकारी कार्यालयाकडून कर आकारल्यास पालिकेच्या उत्पन्नात भर पडेल. यामुळे पालिका आपले काम उत्तमरित्या करू शकेल.