कर्नाटकात आता विधानसभा अध्यक्षपदावरून चढाओढ

0

बंगळूर- कर्नाटकात सत्ता स्थापनेबाबत पेच निर्माण झालेले आहे. राज्यपाल यांनी भाजपला अधिक जागा मिळाल्याने सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले होते, त्यामुळे येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यावर कॉंग्रेस, जेडीएसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत यास आव्हान दिले. याबाबत आज न्यायायालयात सुनावणी झाली असता न्यायालयाने भाजपला उद्या ४ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहे. सत्ता स्थापनेबाबत निर्णय झालेला नसतांना विधान सभेच्या हंगामी अध्यक्ष निवडीवरून चढाओढ सुरु झाली आहे.

कॉंग्रेसचे पारडे जड

सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ विधान सभा सदस्याची हंगामी अध्यक्ष म्हणून निवडण्याबाबत आदेश दिले आहे. कॉंग्रेसकडून अध्यक्ष पदासाठी आर.व्ही.देशपांडे तर भाजपकडून उमेश कट्टी दावेदार आहेत. दोन्ही आमदार ८ वेळा निवडून आले आहे. दरम्यान हंगामी अध्यक्ष पदासाठी कॉंग्रेसचे आर.व्ही.देशपांडे यांचे पारडे जड आहे. कारण १९८३ पासून आमदार आहेत तर भाजपचे उमेश कट्टी १९८५ पासून आमदार आहे.