कर्नाटक निवडणुकीसाठी १०.६० टक्के मतदान

0

बेंगलुरु: कर्नाटक राज्यात विधान सभेच्या २२४  जागेपैकी २२२  जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी 7 वाजेपासून मतदानास सुरुवात झाले आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सकाळपासून मतदानासाठी मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या आहे. दरम्यान माजी पंतप्रधान एच डी देवगौड़ा यांनी आपल्या परिवारासह मतदान केले. हासन जिल्ह्यातील होलेनेरासिपुरा शहरात त्यांनी मदतान केले. मतदानास सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच वोटिंग मशीनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे मशीन बदलण्यात आली. सकाळी ९ वाजेपर्यंत १०.६० टक्के मतदान झालेले होते.

मतदानापूर्वी मंदिरात पूजा

जयानगरमध्ये जेडीएस नेता एचडी कुमारस्वामी यांनी श्रीआदि चुनछानागिरी मठाच्या महास्वामी यांची भेट घेतली तसेच मतदानापूर्वी त्यांनी पत्नीश राजाराजेश्वरी मंदिरात पूजा केली.

भाजपा मुख्यमंत्री  पदाचे उमेदवार

केंद्रीय मंत्री आणि भाजपनेते सदानंद गौड़ा यांनी पुत्‍तुर येथे मतदान केले. भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बीएस येदियुरप्पा यांनी शिमोगा येथे मतदान केले.

गौ-पूजेनंतर मतदान

बदामी येथूनविद्यमान मुख्यमंत्री सिद्धारमया यांच्या विरोधात निवडणूक लढत असलेले भाजप उमेदवार श्रीरामुलू यांनी मतदानापूर्वी गौ-पूजन केले.

अनिल कुंबळे यांनी केले मतदान

भारताचे माजी क्रिकेट पटू अनिल कुंबळे यांनी सह परिवार मतदान करत इतरांना मतदान करण्याचे आवाहन केले.

 

मंगळवारी मतमोजणी

मतदानानंतर १५ मे रोजी म्हणजे मंगळवारी कर्नाटकचा गड कोण जिंकेल हे स्पष्ट होईल. कर्नाटक निवणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर काँग्रेसमोर सत्ता राखण्याचं आव्हान आहे. कारण,२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही लढत दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याप्रमाणेच कर्नाटकातील दोन दिग्गज नेत्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरमैय्या हे काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत, तर भाजपने एल येदियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलं आहे. येडियुरप्पा यांनी यापूर्वी भाजपला २००८  साली सत्ता मिळवून दिली होती.

एकूण ४.९८  कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून ५५  हजार ६००  मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास साडेतीन लाख निवडणूक कर्मचारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी झटत आहेत.