कर्नाटक सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार: कॉंग्रेस, जेडीएसच्या १० बंडखोरांना मंत्रीपद !

0

नवी दिल्ली: कर्नाटकात कॉंग्रेस-जेडीएसचे सरकार जाऊन पुन्हा भाजपचे सरकार आले आहे. कॉंग्रेस-जेडीएसचे ११ आमदार फुटल्याने कर्नाटकात पुन्हा भाजपला सत्ता मिळाली. दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी आज गुरुवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या विस्तारात काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष पक्ष सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या 11 पैकी 10 जणांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे.

कर्नाटक मंत्रीमंडळात एमसी सोमशेखऱ, लक्ष्मण राव, आनंद सिंह, के. सुधारकर, एचए बसावरजा, अराबली हेब्बर शिवराम, बसवानगोडा पाटील, के. गोपालैया, नारायण गोड्डा आणि श्रीमंत बाळासाहेब पाटील यांचा समावेश आहे. भाजपने निष्ठावंतांना डावलले असल्याने नाराजीही निर्माण झाली आहे.