कर्नाटक LIVE… मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी घेतली शपथ

0

बंगळुरु : कर्नाटकाचे २६ वे मुख्यमंत्री म्हणून जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी शपथ घेतली. दुसऱ्यांदा ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना शपथ दिली. दरम्यान उपमुख्यमंत्री म्हणून कॉंग्रेसचे जी.परमेश्वरा यांनी देखील शपथ घेतली.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी यांचे शपथविधी सोहळ्याला उपस्थित झाले होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि सिताराम येच्यूरी बंगळुरुमध्ये आले होते.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू कुमारस्वामींच्या शपथविधी कार्यक्रमासाठी आले.


दरम्यान भाजपकडून आज जनमत विरोधी दिवस पाळला जात असून भाजप कार्यकर्ते ठिकठिकाणी निदर्शने करीत आहे.