कर्नाटक LIVE… कुमारस्वामींनी केले बहुमत सिद्ध

0

बंगळूर-कर्नाटकचे २६ वे मुख्यमंत्री म्हणून एच.डी.कुमारस्वामी यांनी बुधवारी शपथ घेतली. मात्र त्यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केलेले नव्हते. आज त्यांनी विधानसभेत आपला बहुमत सिद्ध केला. विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपने सभात्याग केला. कुमारस्वामी यांनी ११७ आमदारांच्या बळावर बहुमत सिद्ध केला. यात कॉंग्रेसचे ७८, जेडीएसचे ३८ तर एक अपक्ष आमदारांचा समावेश आहे.