बळसाणे । साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील दुसाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा कर्मचार्यांअभावी कोलमडल्या आहेत. आरोग्य सेवा देण्याबरोबरच शासकीय उपक्रम राबविताना कर्मचार्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथे वैद्यकीय दोन अधिकारी असून त्यात एक आरोग्य अधिकारी प्रत्येक शिबिरात उपस्थित राहतात व एक आरोग्य अधिकारी माळमाथा परिसरात रुग्णांना 24 तास सेवा बजावतात. प्राथमिक आरोग्य केंद्र दुसाणे अंतर्गत सात उपकेंद्र असून या आरोग्य केंद्रात आरोग्य सेवकाचे चार पद रिक्त आहेत, तसेच आरोग्य सेविका दोन पद रिक्त आहेत व प्रयोगशाळा तंत्रज्ञान पद रिक्त असल्याने सदर रिक्त पदामुळे कर्मचारी व अधिकारी यांची तारांबळ उडते तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञान पद रिक्त असल्याने गरोदर माता तसेच कुटुंब नियोजन कँम्पला मोठी अडचण भासते.
इमारत जीर्ण
दुसाणे प्राथमिक आरोग्य केंद्र 58 हजार लोकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने वदार आहे. मात्र अनेक अडचणीमुळे वेळेवर वैद्यकीय सेवा मिळत नाही. स्वतंत्र इमारत आहे पण त्याच्या कामासा साठ वर्षे झाल्याने तीही पूर्णतः जिर्ण झाल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात गळतीमुळे रुग्णांची व नातेवाईकांची तारांबळ उडत असते संबंधित विभागाने लक्ष देऊन या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची व कर्मचार्यांच्या खोल्या देखील जीर्ण असून त्यात सुधारणा व्हावी अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
29 गावातील ग्रामस्थ
आरोग्य केंद्राचे कामकाज चालू असून माळमाथा परिसरातील 29 गावातील ग्रामस्थांची काळजी हे हजर असलेले कर्मचारी घेत आहेत. दुसाणे आरोग्य केंद्रांर्तगत दुसाणे , बळसाणे, इंदवे, हाट्टी खुर्दे, लोणखेडी, म्हसाळे, वर्धाने ही सात उपकेंद्रे कार्यरत आहेत. आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी मंजूर पदे भरणे अवशयक आहे. आरोग्य सेविका 4 व रिक्त पदे 3, आरोग्य सेवक रिक्त पदे 4, शिपाई 4 पदे भरलेली असून 1 स्वीपर पद रिक्त आहे.
माळमाथा परिसरात दुसाणे या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्या आरोग्य केंद्राच्या इमारतीची अत्यंत जीर्ण अवस्था झाली आहे. आरोग्य अधिकार्यासह कर्मचार्यांचे रहिवासी खोल्या देखील जीर्ण असून त्या दुरुस्ती करणे गरजेचे आहे. रुग्णांच्या नातेवाईकांसह आरोग्य अधिकारी व कर्मचार्यांची पावसाळ्यात पाण्याच्या गळतीमुळे उपचारासाठी तारांबळ उडते.
– महावीर जैन, ग्रामपंचायत सदस्य