कर्मचार्‍यांच्या अल्प वेतनश्रेणी वाढीच्या प्रस्तावाला विरोध

0

नंदुरबार । इंडियन बँक्स असोसिएशन या संस्थेकडून देशातील बँकांच्या कर्मचार्‍यांच्या वेतनश्रेणीत दोन टक्क्याने वाढ करणे प्रस्तावित होते. या प्रस्तावाचा अधिकारी व कर्मचारी संघटनांनी तीव्र विरोध दाखवित काल बुधवार व आज गुरुवारी संप पुकारला आहे. जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

विविध बँक पदाधिकारी सहभागी
स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफिसर असोसिएशन चे जिल्हा सचिव कैलास सामुद्रे, बँक व्यवस्थापक अर्जुन ठींगळे, स्टाफ युनियनचे जिल्हा सचिव राजीव शिरसाळे, युनियन सेक्रेटरी मनोज पिंगळे, विसरवाडीचे शाखा व्यवस्थापक सतीश वळवी,प्रकाश महाले,विलास मुळे, राजू भावसार, राहुल चुटके, रोशन वसावे, अजित कुमार, विष्णु कुमार, अशोक वाघ ,बाबुराव पवार, अनिल गिड्डे, सांडू काकडे, प्रवीण पाटील, संजय मराठे, मकरंद खैरनार, संजय भारमल, मयूर पाटे, शिरीष वळवी अनिल रघुवंशी ,धीरेंद्र राजपूत, तुळशीराम खैरनार, रहीम शेख,दीपक पाडवी, अनुपम कुंभार, सुधाकर देवरे आदींनी सहभाग घेतला. जिल्ह्यात भारतीय स्टेट बँक 12, देना बँक 3, बँक ऑफ बडोदा 6, बँक ऑफ इंडियाच्या 2, सेंट्रल बँक बँक, ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, कॅनरा बँक यासह विविध राष्ट्रीयीकृत बँकांच्या 63 शाखा आहेत.