कर्मचार्‍यांना वेतनश्रेणी लागू करण्याचे आश्‍वासन

0

चोपडा। अनुदानित मागासवर्गीय वसतिगृहातील कर्मचार्‍यांना वेतनश्रेणी लागू करावी म्हणून कर्मचारी संघटनेतर्फे लढा सुरु आहे. दरम्यान अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार यांची संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी भेट घेवून त्यांना समोर समस्या मांडली. समस्येवर त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.

वस्तीगृह कर्मचार्‍यांना वेतनश्रेणी लागू करण्यास तत्त्वता मान्यता दिली आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी हजर होते. अनुदानित आदिवासी वस्तीगृह कर्मचारी संघटनेतर्फे पदाधिकार्‍यांनी आश्‍वासनाचे स्वागतही केले असून वेतनश्रेणीला तत्त्वता मंजुरी प्रदान केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष संजिव शिरसाठ यांनी आभार मानले आहेत.