कर्मचार्‍यांसाठी योग प्रात्यक्षिक व व्याख्यान

0

जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त विद्यापीठ कर्मचार्‍यारी त्यांच्या कुटुंबियांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी योग प्रात्यक्षिक व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने 20 व 21 जून रोजी सकाळी 7 ते 8 या दरम्यान विद्यापीठ परिसरात राहणार्‍या कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांसाठी विद्यापीठाच्या पदवीप्रदान सभागृहात योग शिक्षकांकडून प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. 21 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत विद्यापीठाच्या अधिसभागृहात औरंगाबादचे योग तज्ज्ञ डॉ.गिरीधर करजगांवकर आणि मु.जे.महाविद्यालयातील सोहम डिपार्टमेंट ऑफ योग नॅचरोपॅथीच्या विभागप्रमुख प्रा.आरती गोरे यांचे योग विषयक व्याख्यान होणार आहे. माहिती प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांनी दिली.