हडपसर । अण्णासाहेब मगर यांच्या जीवनावरील कर्मयोगी ‘अण्णासाहेब मगर : काळ, व्यक्तित्व, कर्तृत्व’ या ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. राजा दीक्षित, सतीश मगर, निलेश मगर, सागर काळभोर, लेखिका सीमा काळभोर आदी उपस्थित होते. अमेय प्रकाशनाने हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे.
या ग्रंथाला शरद पवार यांची प्रस्तावना आहे.
या संशोधनात्मक ग्रंथांमुळे अतिशय महत्त्वाच्या दुर्लक्षित अशा विषयावर प्रकाश टाकणे शक्य झाले आहे. अण्णासाहेबांनी पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये विविध सहकारी संस्था स्थापन करून पुणे जिल्ह्याचा विकास केला होता. असे लेखिका काळभोर यांनी सांगितले.