कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

0

नवी मुंबई : थोर समाजसुधारक व शिक्षकांचे शिक्षक पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 130 व्या जयंतीचे औचित्य साधून वाशीतील मॉडर्न कॉलेजमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कॉलेज प्रशासनाने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले कि अण्णांची 130 वी जयंती दरवर्षीप्रमाणे पूर्ण आठवडा 17 ते 22 सप्टेंबरदरम्यान साजरी करण्यात येणार आहे. या जयंती सप्ताहाची सुरुवात ’कर्मवीर मॅरेथॉन’ ने रविवारी होणार असून तीन शैक्षणिक गटात ही स्पर्धा सकाळी 7 वाजता मॉडर्न कॉलेज पासून सुरु होईल.

दर्जेदार शिक्षणासाठी एक धाव या ब्रीद वाक्याने सुरू होणार्‍या मॅरेथॉनला महापौर सुधाकर सोनावणे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. विजेत्यांना रोख रक्कम, मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. याची माहिती प्राचार्य डॉ. व्ही. एस. शिवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.