नेरुळ । कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा एन.एस.एस युनिट च्या माध्यमातून दिनांक 26 सप्टेंबर 2017 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. व्ही. एस. शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सध्या राज्य रक्त संक्रमण परिषेदेच्या रक्तपेढ्यांमध्ये असलेला रक्ताचा तुटवडा थोड्याफार प्रमानात तरी भरून काढण्याचा उद्देश ठेवत व रक्तदानाबद्दल महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त जागृती व्हावी ह्या हेतूने हे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. ह्या शिबिरा साठी एन.एस.एस च्या स्वयंसेवकानी वर्गा-वर्गामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले.
हॉस्पिटलमधील रुग्णांना फळ वाटप
या आवाहनास प्रतिसाद देत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून रक्ताचे युनिट नवी मुंबई महानगरपालिका हॉस्पिटल रक्तपेढीस सुपूर्द केले. तसेच नवी मुंबई महानगरपालिका हॉस्पिटल मधील रुग्णांना फळ वाटप केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना थेलेसमिया टेस्ट करण्यात आले त्यामध्ये 200 विद्यार्थी विद्यार्थ्यांनी टेस्ट करून घेतली.