‘कर्म किसी का पीछा नही छोडता’;शिवराजसिंह यांचा कमलनाथांना टोला

0

भोपाळ-आज मध्य प्रदेशचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ यांनी शपथ घेतली. दरम्यान आजच ३४ वर्ष जुन्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. शीखविरोधी दंगलीप्रकरणी कमलनाथ यांच्यावर देखील आरोप आहे. हाच धागा पकडत शिवराजसिंह यांनी ‘कर्म किसी का पीछा नही छोडता’ असे ट्वीटकरत कमलनाथ यांना टोला लगावला आहे.

दरम्यान शिवराजसिंह चौहान कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. त्यांनी ट्वीटरवरून कमलनाथ यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.