वारजे । बाल तानाजी मित्र मंडळ कर्वेनगर येथील बाल तानाजी मित्र मंडळ मावळे आळी येथे गुरुवारी सकाळी देवीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. नवरात्रौ उत्सवाच्या निमित्ताने भाविकांसाठी रासदाडिया, रांगोळी तसेच विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रोज पहाटे देवीची आरती केली जाते.
येथील आदिमाता अंबामाता नवसाला पावणारी असल्याने देवीच्या दर्शनाची भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमाद्वारे यमगरवाडी येथील अनाथआश्रमातील मुलांमुलींना धान्य वाटप करण्यात येते. त्यासाठी भाविकांनी अन्नदान केले होते. कै. दत्तात्रय हिरामण बाठे यांनी 1984मध्ये मंडळाची स्थापना केली असल्याचे राजाभाऊ बराटे यांनी सांगितले. मंडळाचे शिवाजीराव लक्ष्मण थोपटे, सुभाष गणपत फाटक, श्रीकांत वसंत बराटे, संजय बबनराव तनपुरे, मंगेश सुदाम वरगडे, विनोद टाकळकर, हरिदास दत्तात्रय बाठे, ज्ञानेश्वर बाठे, नचिकेत अल्लापुरकर, प्रशांत सणस, किरण फाटक, दामू पडवळ, दत्तात्रय फाटक, दशरथभाऊ केळकर, मुफिद शेख, नितीन मोरे, ज्ञानेश्वर फाटक आदी कार्यकर्ते यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती राजाभाऊ बराटे यांनी दिली.
वनदेवीची पालखीतून मिरवणूक
कर्वेनगर येथील वनदेवी मंदिरास नवरात्रौनिमित्त गुरुवारी सकाळी 9 वाजता देवीची पालखीतून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यंदाच्या वर्षी सदर मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच विद्युत रोषणाई केल्यामुळे सदर परिसर उजळला आहे. या यात्रेनिमित्त परपात्रांतून अनेक विक्रेत मोठ्या संख्येने आपले स्टॉल लावले आहेत. त्यात विविध पाळणे, मनोरंजनाची साधने मोठ्या प्रमाणावर उभारणी करण्यात आली आहे. पूर्वीचे हिंगणे गाव असलेल्या कर्वेनगर हे मुठा नदीच्या तीरावर होते. मंदिरापर्यंत जाण्यासाठी त्यावेळी एक लहान पायवाट होती. सर्व परिसर जंगलाने वेढला होता. गुराखी त्यांच्या जनावरांना चरायला घेऊन येत असत. सरपण गोळा करण्यासाठी महिलांचा सहभाग होता.
जयभवानीनगर मंदिर
कोथरूडमधील जयभवानीनगर येथे गुरुवारी शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली. हे मंदिर पुरातन असून स्थानिक नागरिकांचे ते श्रद्धास्थान आहे. मंदिर समितीचे सचिव नवनाथ सुतार म्हणाले, छोट्या स्वरुपात शिवकालीन काळापासून पौड रोडवर मंदिराची स्थापना केली होती. परंतू वाढती लोकसंख्या व रहदारीमुळे सदर मंदिर रस्तारुंदीत जात असल्याने शशिकांत सुतार यांच्या प्रयत्नातून जवळच्या टेकडीवर भव्य मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. नवरात्रौवानिमित मंदिराला रंगरंगोटी केली. पिण्याच्या पाणी सोय देवस्थानने केली आहे. गुरुवारी सकाळी महाअभिषेक, व देवीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर घटस्थापना केली असून देवी महाआरतीसह महानैवेद्ययाचे वाटप करण्यात आले. मंदिर परिसरात भजन व किर्तन व श्रीसुक्तपठण व इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले आहे. देवीचे मंदिर भाविकांसाठी चोवीस तास खुले ठेवण्यात येणार असल्याचे देवस्थानचे सचिव नवनाथ सुतार यांनी सांगितले आहे.