पुणे : कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकातील उड्डाण पुलाच्या कामास गती देण्यासाठी वाहतूक बदल करण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महामेट्रोने केले आहे.
हे देखील वाचा
मध्यरात्रीपासून चौकात बॅरिकेडिंग केले जाणार आहे. आता अंशत : चक्राकार वाहतूक केली जाणार आहे.जड वाहने कर्वे रस्त्याने तर दुचाकी आणि चारचाकी वाहने आणि रिक्षा अशा हलक्या वाहनांना कॅनॉल रस्त्याने पुढे जाता येईल. उड्डाणपुलाच्या नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, महामेट्रो आणि वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीतच उड्डाणपूल कामासाठी वाहतूक नियोजन निश्चित करण्यात आले .