बारामती । एन्व्हॉयमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने शहरातून वाहणार्या कर्हा नदीची स्वच्छता करण्याची मोहीम सोमवारपासून हाती घेण्यात आली आहे. फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या मोहिमेला प्रारंभ झाला.
नदी पात्रात साचलेला गाळ, जलपर्णी यामुळे या भागात दुर्गंधी पसरते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. ही बाब विचारात घेऊन गेल्या वर्षीपासून सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फोरमच्या वतीने नदी पात्राची स्वच्छता करण्यात येते. खंडोबानगरपासून गुनवडी रोडपर्यंतच्या नदी पात्राची स्वच्छता केली जाणार आहे. या मोहिमेमुळे कर्हा नदी स्वच्छ होणार आहे. याप्रसंगी पवार यांच्या हस्ते सॅनी कंपनीचे समन्वयक अविनाश सावंत यांचा सत्कार करण्यात आला. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, जिल्हा परिषद सदस्य भरत नाना खैरे, गटनेते सचिन सातव, नगरसेवक अतुल बालगुडे, संतोष जगताप, सूरज सातव, अमर धुमाळ, मयूर लालबिगे, गणेश सोनवणे, सत्यव्रत काळे, बाळासाहेब जाधव, सुहासिनी सातव, समीर चव्हाण यांच्यासह फोरमचे सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.