धायरी : वडगाव बुद्रुक-खुर्द, धायरी, हिंगणे खुर्द येथील असंख्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न राहत्या घरांवरील तिप्पट करआकारणी नियमित (सिंगल) करून घेण्यासाठी महापालिका करआकारणी आणि करसंककलन विभागामार्फत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याचे उद्घाटन आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते झाले. नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य हरिदास चरवड यांनी या संदर्भात पाठपुराव केला होता. यावेळी करआकरणी व करसंकलन विभागाचे उपायुक्त सुहास मापारी, टिळक रोड क्षेत्रिय अधिकारी उमेश माळी, स्थानिक नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, नगरसेविका नीता दांगट, राजश्री नवले, मंजुषा नागपुरे, ज्योती गोसावी, बाळासाहेब जाधव, शिवाजी येवले, हेमंत दांगट, अनंत दांगट, कुलदीप चरवड, अॅड. दिलीप गायकवाड, गंगाधर भडावळे, बाळासाहेब पोरे, संजय पवळे, रामेश्वर चिखले, चंद्रकांत पवळे, केदार जाधव, तसेच करसंकलन विभागाचे संजय काळे, संतोष दैठणकर, सतीश नवले, अजित गारळ आदी उपस्थित होते. शिबिरात ज्या मिळकतींची अद्याप करआकारणी झालेली नाही, वाढीव बांधकाम, जागावापरात बदल, अनधिकृत मिळकतींचे क्षेत्र 600 ते 1000 चौरस फूट आहे, अशा मिळकतींची नवीन धोरणांनुसार सुधारित करआकारणी आदी बाबींचे अर्ज नागरिकांकडून भरून घेण्यात आले.