कर न भरणार्‍या शाळांसह चित्रपटगृहांना सील करा

0

भुसावळ । शहरात असलेल्या शाळा, महाविद्यालये, व्यापारी संकुलासह चित्रपट गृहांकडे बाकी असलेली पालिका कराची थकबाकी मार्च अखेर जमा न झाल्यास यांना सील करा अशा सुचना नगरविकास विभागाचे सहाय्यक सचिव संजय दुसाने यांनी दिल्या. पालिका सभागृहात अधिकारी व कर्मचार्‍यांसह बैठक घेऊन कर वसुलीसंदर्भात सक्त ताकीद कर्मचार्‍यांना दिली. वसुली न झाल्यास कर्मचार्‍यांच्या पगारात कपात करण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. सहाय्यक सचिव दुसाने यांनी भुसावळ विभागातील नगरपालिकांमध्ये भेटी दिल्या.

100 टक्के वसुली करा
याप्रसंगी मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर, जिल्हाधिकारी कार्यालयातील अनिकेत मनूरकर उपस्थित होते. या बैठकीत दुसाने यांनी लाखांच्या वर थकबाकी असलेल्या मालमत्तांची तपासणी करुन त्या सील करा 31 मार्च पर्यंत शहरात 100 टक्के कर वसुली झालीच पाहिजे. वसुली पुर्ण न झाल्यास कर्मचार्‍यांच्या वेतनातून कपात केली जाईल असा इशारा देखील दुसाने यांनी यावेळी उपस्थित असलेल्या कर्मचार्‍यांना दिला.