‘कलंक’चा बॉक्स ऑफिसवर धमाल; तीन दिवसात केली इतकी कमाई !

0

नवी दिल्ली: करण जोहर दिग्दर्शित कलंक चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस उलटले आज चौथा दिवस आहे. चित्रपट धमाल कमाई करत आहे. कलंक २०१९ मधील सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे. तीन दिवसात चित्रपट ५० कोटींच्या जवळपास पोहोचला आहे. पहिल्या दोन दिवसात कलंकने ३३.०५ कोटींची कमाई केली. पहिल्या दिवसी 21.६ कोटींचा गल्ला जमवला होता. दुसऱ्या दिवशी आकडा थोडा खाली गेला, दुसऱ्या दिवशी ११.४५ कोटींची कमाई झाली.

अभिनेता संजय दत्त, धकधक गर्ल माधुरी दीक्षित, वरून धवन, आलिया भट, सोनाक्षी सिंन्हा, आदित्यराय कपूर यांची प्रमुख भूमिका आहे. तगडी स्टार कास्ट असल्याने हा चित्रपट मोठी कमाई करणार आहे.