चारही कलाप्रकारात मिळाली पारीतोषिके
भुसावळ– पश्चिम बंगालमधील कोलकता येथील हिंदूस्तान आर्ट अॅण्ड कल्चरल सोसायटीतर्फे आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय, अंतरा संगीत विद्यालय व कोलकाता महानगरपालिकेच्या सहकार्याने नुकताच ‘भारत संस्कृती महोत्सव’ झाला. त्यात भारतातल्या महाराष्ट्र, आसाम, ओदिशा, छत्तीसगड, झारखंड यांसह विविध राज्यातील कलावंतांनी सहभाग नोंदवला. यात चित्रकला, शास्त्रीय गायन, वाद्य वादन, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, शिल्पकला अशा विविध प्रकारच्या राष्ट्रीयपातळीवरील स्पर्धा झाल्या. या महोत्सवात शिल्पकेतील प्रथम क्रमांक भुसावळच्या रमाकांत भालेराव यांनी पटकावला तर चित्रकलेतील प्रथम साहिल दीपक फालक, कथ्थक नृत्यात प्रचिती कुळकर्णी, लोकनृत्यात रोहिणी महाजन यांनी तृतीय क्रमांक पटकावला. ही स्पर्धा जोरासंक ठाकूरवाडी आणि ओरिएंटल स्कुल याठिकाणी घेण्यात आली. या कलावंतांना रामकांत व चारू भालेराव यांचे मार्गदर्शन व दीपक फालक आणि ज्योत्स्ना कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले होते.