जळगाव: केंद्र सरकारने ऐतिहासिक घोषणा केली आहे. कलम ३७० रद्द करण्याची शिफारस संसदेत करण्यात आली आहे. त्यामुळे आता जम्मू-काश्मीरला असलेल्या विशेष राज्याचा दर्जा काढला जाणार आहे. या निर्णयाचा जळगावात जल्लोष करून स्वागत करण्यात आले. भाजपकडून फाटके फोडून आणि पेढे वाटप करून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.