कलम ३७० हटवणे ऐतिहासिक पाऊल: लष्कर प्रमुख

0

नवी दिल्ली: जम्मू काश्मीर मधून कलम ३७० कलम हटवणे हे केंद्राचे ऐतिहासिक पाऊल असल्याचे लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटले आहे. या निर्णयामुळे जम्मू काश्मीर राज्य मुख्य प्रवाहात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच पाकिस्तानला इशारा देत लष्कर झीरो टॉलरन्सच्या नीतीवर चालते आणि दहशतवादाला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराकडे अनेक पर्याय असल्याचे सांगितले. भारतीय लष्कराच्या भविष्यातील योजनांबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली.

दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्यासाठी आमच्याकडे अनेक पर्याय आहेत आणि त्याचा वापर करण्यास आम्ही कदापि कचरणार नाही, असं ते म्हणाले. लष्कराचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. भविष्यात होणाऱ्या युद्धाच्या स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यासाठी इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप स्थापन करण्यात येत आहे. स्पेस, सायबर, विशेष कारवाया, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयरवर भर देण्यात येत आहे. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तंत्रज्ञान क्षमता वाढवण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येत असल्याचं नरवणे यांनी सांगितलं.