‘कलवरी’नौदलात दाखल

0

मुंबई : संपूर्ण भारतीय बनावटीची ‘कलवरी’ही पाणबुडी गुरुवारी भारतीय नौदलात दाखल झाली. मुंबईतल्या माझगाव डॉकयार्डवर पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीमारामण यांच्याहस्ते ही पाणबुडी देशसेवेत रूजू झाली. कलवरी ही स्कॉर्पियन श्रेणीतली उच्च अशा दर्जाची पाणबुडी असल्याने देशाच्या नौदलाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.

देशाच्या सागरी सुरक्षेला मोठी मदत ही कलवरी पाणबुडी देणार आहे. मुंबई डॉकयार्डवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते ही पाणबीडी नौदलाकडे सुपुर्द करण्यात आली. कार्यक्रमाला संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नौदलप्रमुख सुनील लांबा हे उपस्थित होते.