कलाकारांचा ‘नवनिर्माण कलागौरव पुरस्काराने’ गौरव

0

चित्रपट सेनेच्या पदाधिकार्‍यांच्या केल्या नियुक्त्या

निगडी : महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना पुणेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त चित्रपट क्षेत्रात गेल्या वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणा-या कलाकारांना ’नवनिर्माण कलागौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यातील चित्रपट सेनेच्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, सरचिटणीस शशांक नागवेकर आणि उपाध्यक्ष रमेश परदेशी यांच्या हस्ते ‘नवनिर्माण कलागौरव पुरस्काराने’ कलाकारांचा सन्मान करण्यात आल्या. त्यामध्ये प्रवीण तरडे (फर्जंद चित्रपट), देवेंद्र गायकवाड (बबन चित्रपट), निपुण धर्माधिकारी (राष्ट्रीय पुरस्कार), नरेंद्र भिडे (संगीत क्षेत्र), पार्थ भालेराव (बॉईझ चित्रपट), महेश साळगावकर (कला दिग्दर्शन), केदार दिवेकर, निखिल लांजेकर (फर्जंद पार्श्‍वसंगीत), जयेश दळवी, मंगेश काळे (साई छाया मिसळ), एम. के. धुमाळ (एम. के. स्टुडिओ) यांचा समावेश आहे.

चित्रपट सेना मदतीस तत्पर
यावेळी बोलताना अमेय खोपकर म्हणाले की, चित्रपटसृष्टीत कलाकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच मराठी चित्रपटाला त्यातील कलाकारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी मनसे चित्रपट सेना ही नेहमीच मदतीला सर्वात पुढे असते. हेच कार्य आणखी जोमाने वाढविण्यासाठी व पक्ष संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने पदनियुक्त्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील कलाकारांना व्यासपीठ मिळावे. तसेच कलाकारांना जास्तीत जास्त कामे मिळावित यासाठी चित्रपट सेना नेहमीच आग्रही राहिली आहे.

तसेच यावेळी महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यातील 200 हुन अधिक पदाधिकार्‍यांच्या नेमणूका करण्यात आल्या. पुणे शहर व जिल्हा संघटक पदी चेतन धोत्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.