कलाकारांना ‘गौरव हडपसरचा पुरस्कार’ प्रदान

0

हडपसर । एवढे कलाकार हडपसरमध्ये असताना बाहेरून कलाकार का बोलवयाचे? इतकी सुंदर कला सादर केली आहे की, उपनगरमध्ये हे प्रथमच घडतेय. हडपसरचा माझा खूप जुना संबंध आहे. या कार्यक्रमात हारतुरे, शाल, श्रीफळ यांना फाटा देऊन हद्य सत्कार करण्याचे उत्तम कार्य हडपसर कलाकारांनी पार पाडले आहे, असे गौरवोदगार ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले यांनी काढले.

हडपसर कलाकार महासंघ-ए-स्क्वेर ग्रुप आणि आशीर्वाद साडी डेपो यांच्या वतीने हडपसरचे नाव एका उंचीवर नेऊन नावलौकिक मिळवलेल्या धुरंधर कलाकारांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.मराठी नाटक व चित्रपटातील कलाकारांनी नृत्य-नाट्य-गीत आणि संगीताने या सोहळ्यास रंगत आणली. चित्रपट अभिनेते विजय पाटकर, अभिनेते सुनील गोडबोले, अभिनेत्री मिताली निंबाळकर, अभिनेत्री तेजस्विनी वेताळ, नाट्य निर्माते दत्ता दळवी, श्रीकृष्ण भिंगारे, नगरसेवक योगेश ससाणे, नगरसेविका उज्ज्वला जंगले यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. टीव्ही-चित्रपटातील कलाकार यांना प्रत्यक्ष कला सादर करताना पाहून रसिकांनी भरभरून दाद दिली.

हडपसरमधील संजय भाडळे-पाटील, निर्माते डॉ बाळासाहेब हरपळे, ज्येष्ठ अभिनेते भानुदास लोंढे, अभिनेत्री परी पाबळकर, गायक प्रदीप कांबळे, गायक अमर पुणेकर, दिग्दर्शक संजय सिंगलवार, गायक गणेश कदम या कलाकारांना गौरव हडपसरचा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘सुया घ्या पोत घ्या’, कव्वाली, विनोदी किस्से, लावणी सादर करून उपस्थित रसिकांची वाहवा मिळवली. अभिनेत्री मेघा पवार, उद्योजक तुकाराम वरकडे-पाटील, अभिनेत्री स्नेहल सोनवणे आदी उपस्थित होते. प्रथम काबंळे, कुणाल देशमुख, बाळासाहेब पवार, पांडुरंग अडसुळ, अमोल दुगाने, जयश पाटील, नागनाथ गवसाने यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन स्वाती जगदाळे, आनंद खुडे यांनी केले.