कलाक्षेत्रच जीवनात रंग भरते

0

चाळीसगाव । जीवन जगतांना अनेक क्षेत्रांमध्ये जाण्याची विद्यार्थ्यांची तयारी असते. मात्र अनेक क्षेत्र ही माहीतीच नसतात अशाच कला क्षेत्रांमध्ये 45 प्रकारचे क्षेत्र आहेत. या क्षेत्रांमध्ये जर अभ्यास करून शक्ती पणाला लावली तर जगाच्या नकाशात आपले नाव एक यशस्वी व्यक्ती म्हणून होऊ शकते. म्हणून कला क्षेत्रात सात्यत्यपुर्ण सराव व अभ्यास केला तर स्वत: सह जगाच्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकते, अशा भावना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सिलीका या संस्थेचे विभाग प्रमुख प्रा. जयंत पाठक यांनी येथील राजपुत मंगल कार्यालयात 11 मे 2017 रोजी सकाळी 10 वाजता झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी व्यासपिठावर फेथ अ‍ॅकेडमीचे संचालक आर्की. संजय बारीस, नेक्ससचे संचालक डॉ. संतोष मालपुरे जेष्ठ आर्की, अरूण भावसार, संजय चौधरी, डॉ. सुनिल राजपूत, नगरसेवक रामचंद्र जाधव, संजय वर्मा, रविंद्र अमृतकार, शरद मोराणकर, मेघा बक्षी, डॉ. कविता पाटील, कल्पना बारीस आदी मान्यवर उपस्थित होेते.

या क्षेत्रात शिकण्याची संधी
यावेळी बोलतांना श्री. पाठक म्हणाले कि, डिझाइन फॅशन, आर्कीटेकचर या क्षेत्रांमध्ये खुप नवनविन शिकण्याची संधी आहे. यासाठी आपली ईच्छा शक्ती हवी असते. या ईच्छा शक्तीच्या जोरावर तुम्ही या क्षेत्रामध्ये उतुंग यश मिळवू शकता याशिवाय इडंस्ट्रीय डिझाइन प्रॉडक्ट ट्रान्सपोर्टशन डिझाईन कम्युनिकेशन, फॅशन लाईफ स्टाईल अ‍ॅक्सेसरी, टेक्सटाईल व फॅशन कम्युनिकेशन आदी विषयावर मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देऊन 200 विद्यार्थ्यांची अ‍ॅपटीट्युड टेस्ट घेण्यात आली. या विद्यार्थ्यांना नंतर वैयक्तीक मार्गदर्शन करण्यात आले तर 15 विद्यार्थ्यांची 2 तासांची कल चाचणी घेण्यात आली. या प्रसंगी अरूण भावसार, डॉ. सुनिल राजपूत यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक आर्की, संजय बारीस यांनी केले. तर कार्यक्रमाचा हेतू डॉ.संतोष मालपुरे यांनी सांगितला. मान्यवरांचा परिचय कल्पना बारीस यांनी करून दिला.

यांची होती उपस्थिती
सुत्रसंचलन दिपक पाटील यांनी केले तर आभार सारीका मालपुरे यांनी मानले. कार्यक्रमास लालचंद बजाज, आधार महाले, वासुदेव बक्षी, रितेश वाणी, अमोल येवले. अनंत सातपुते, निकीता बक्षी, सुनिल पाटील, प्रतापराव चव्हाण, यांच्या सह शहरातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहुल बारीस, अरूल बारीस, अनिल धामने, महेंद्र पाटील, दिपक महाले, तेजस बेलदार हितेश पाटील, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

15 विद्यार्थ्यांची घेतली 2 तासांची कल चाचणी
200 विद्यार्थ्यांची घेतली अ‍ॅपटीट्युड टेस्ट
राजपूत मंगल कार्यालयात झाले मार्गदर्शन