धुळे । शहरातील देवपुर येथील वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे आबालवृद्धांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या व्यक्तीमत्व विकासाला चालना मिळावी म्हणून गणेशोत्सवात विविध प्रकारच्या स्पर्धा होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लहान मुलामुलींसाठी झालेल्या नृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुलामुलींचे कलागुण पाहून उपस्थित भारावले. त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटाने स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे इंदिरा गार्डनमध्ये श्री गणरायाच्या आगमनानंतर रोज विविध कार्यक्रम, उपक्रम व स्पर्धा सुरू आहेत. त्यात लहान मुलामुलींपासून जेष्ठांपर्यंत सर्वांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना अभिव्यक्त होता यावे, लहान मुलामुलींसह युवक विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व विकास खुलावे म्हणून घेतल्या जात असलेल्या स्पर्धांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
लहान मुलांचा सहभाग
नृत्य स्पर्धेत आकर्षक पेहराव करून मुलामुलींनी अप्रतिम नृत्य सादर करून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांची वाहवा मिळविली. विविध गितांवर तीन तास रंगलेली स्पर्धा सर्वांच्या पसंतीस उतरली. चॅनलवरील कार्यक्रमातील इंडियन हिपहॉप चॅम्पियनशिप विनर चेतन व विजय सेलिब्रेटी होते. त्यांच्या उपस्थितीत झालेली नृत्य स्पर्धा लहान मुलामुलींनी गाजवली.
यांची होती उपस्थिती
वंदे मातरम प्रतिष्ठानचे पदाधिकारी डॉ. संदीप पाटील, कृपेश नांद्रे, शामकांत बोरसे, गिरीश मराठे, प्रशांत मेखा, अमोल चौधरी, संदीप पाटील, प्रा. सागर चौधरी, ईश्वर वाघ, सुधीर बोरसे, नीलेश राजपूत, सचिन बोरसे, मिलिंद बोरसे, सुशील बोरसे, हरीश चौधरी, संजय ठाकरे, सुनील पाटील, बाळा शिनकर, सतीश पाटील, महेश कुवर, अभय पाटील आदी उपस्थित होते.