नवापूर । महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण विभाग मुक्ताई बहुउदेशीय संस्था लातुर आणि उपजिल्हा रुग्णालय नवापुर यांच्या संयुक्त विदयमाने कलापथकाव्दारे पथनाटय सादर करुन एडस् जनजागरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.सदर कार्यक्रम बसस्थानक तसेच नवापुर वरीष्ठ महाविदयालय नवापुर येथे आयोजित करण्यात आला पथनाटयाव्दारे एडस् ची कारणे लक्षणे निदान आणि उपचार या संबंधी माहीती देण्यात आली तसेच एड्स या आजारा विषयी समाजात निर्माण झालेले समज गैरसमज दुर करण्यात आले.
बसस्थानक, महाविद्यालय परिसरात जागृती
कार्यक्रमात वैद्यकीय अधिक्षक डॉ अविनाश मावची आगार प्रमुख पी.डी देवरे प्राचार्य ए. जी. जयस्वाल, प्रा. डॉ. आय. जी. पठाण, प्रा.गजरे आदी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे आयोजन उपजिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक कैलास माळी यांनी केले. तर प्रयोग शाळा तंत्रन्य प्रविण वाघ, डी ए. पवार आदींनी घेतले. सदर कार्यक्रम कला पथक प्रमुख उषा कामळे, अरविंद खंदारे, कृष्णा वैष्णव, कैलास हिवराडे, सतिष वाघ, यशवंत साळवे, दिलीप बडक तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितिन मंडलीक व जिल्हा परिवेक्षक विश्वास सुर्यवंशी यांचे मार्गदर्शना खाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.